सर्वसामांन्यांची भावना अशी - एकीकडे खटला सुरु आहे व दुसरीकडे हा माणूस
चित्रपट करत आहे, पैसे मिळवत आहे. ही न्यायव्यवस्थेची चेष्टा आहे. अगदी बरोबर, ही भावना फक्त सर्व सामांन्यांची - जे अनेकदा अति भाबडेपणा व स्वप्नाळू आदर्शवादाने पछाडलेले असतात, त्यांचीच असू शकते.
सरकारी संस्था जरा जासतच स्वच्छ असाव्यात अशी लोकांची अपेक्षा असते. म्हणून गुन्हा जर नोकरी कामाशी संबंधित असेल तरच - अन्यथा नाही - सस्पेंड करतात. ते सुद्धा सरसकट नव्हे तर काही विशिष्ट परीस्थीत. खाजगी संस्थेत तर मालक/ व्यवस्थापन त्यांना जे वाटेल ते नियम करू शकतात. एकादी
प्रतिष्ठित संस्था असेल तर ते आपली प्रतिष्ठा टिकवून ठेवण्या करता कदाचित
नोकरी सोडून जायला सांगतील, - जसे इंफोसिस ने फणीश मूर्तीला जायला सांगितले
- म्हणजे राजीनामा घेतील, पण काढणार नाहीत. फरक आहे. गुन्ह सिद्धा व्ह्यायच्या आधीच काधले तर ती व्यकती कोर्टात दाद मागू शकते.
ज्या गुन्ह्याचा नोकरी कामाशी काहीही संबंध नाही, जसे गाडी खाली कोणाला चिरडणे, त्या करता सस्पेण्ड केलेच पाहीजे, असा कोणताही नियम नाही. व असू पण नये. अन्यथा
कोणाही नोकरदार व्यक्तीला जेरीस आणणे फारच सोपे होईल. समजा एक वरची जागा
रिकामी होत आहे, व त्या जागे वर बढती करता तुमच्यात व माझ्या स्पर्धा आहे.
तर मी तुमच्या वर काही तरी फौजदारी गुन्ह्या दाखल करण्याची व्यवस्था करेन,
स्वतः नामानिराळा राहून, व तुमचा सहज काटा काढेन. दहा वर्षा नंतर तुम्ही निर्दोष सिद्ध व्हाल. पण तो पर्यंत बढती मला मिळालेली असेल व मी तुमचा बॉस असेन. कोणतीही संस्था असे होऊ देणार नाही.
आणि जी व्यक्ती नोकरीतच नाही, तिला कोणताही नियम लागूच होत नाही. तुम्ही ज्या दुकानातून किराणा घेता, त्या दुकानदारा वर कोणते आरोप असतील व खटले चालू असतील याची तुम्ही शहनिशा करता? जो सी-ए तुमचे इनकम टॅक्स रिटर्न तयार करतो त्याचे चारित्र्य स्वच्छ आहे का याचा तुम्ही कधी विचार करता? जो पायलट तुमचे विमान चालवितो त्याचे स्वीस बँकेत खाते अहे का याच्या तुम्हाला काही कर्तव्य असते ? मग सलमान यांच्या पेक्षा वेगळा कसा?