नमस्कार सर,
आज पर्यंत फार लेख वाचले शेतकरयांच्या मुस्कटदाबी बद्दल. तुम्ही जे लिहिला आहे तेवढा पोट तिडकीने आणी अचूक नव्हता वाचला. मी फार बोलतो ह्या विषया वर तडफड होते जिवाची पण काही करता येत नाही त्यांच्या साठी. त्यांची दुःखे फार मोठी आहेत. त्याना बरोबर मार्गदरशनाची गरज आहे.
मी कौलेज ला असताना एकादा आमची क्रिकेट टीम सराव संपवून मैदानावर बसलेली असताना एक असाच माणुस आला आणि आमच्या बरोबर बोलू लागला त्याने थोडा पाणी मागीतला आणि परत तो म्हणाला की ह्या मैदाना वरचे गवत कापून देतो. तुम्हाला योग्य वाटेल तेवढी मजुरी द्या. तो माणुस साधा दिसत होता पण अगदी मजुर वाटावा एवढा गरीब दिसत नव्हता. आम्ही त्याला विचारल्यावर त्याने आम्हाला सांगितले की त्याची स्वताहाची ५ एकर जमीन आहे. पण पाणी नाहि. गेले बरेच वर्षे बरेच प्रयत्न केले आणी आता सगळे घर दार जनावरे विकून मजुरी साठी गाव सोडला आहे. त्याने त्याच्या भाषेत शेतकर्यांच्या परीस्थिती बद्दल जे सांगितला ते अगदी विदारक होता अगदी अस्वस्थ असहाहय वाटाव इतका. ते कधी ही विसरता येणार नाही मला.
आपल्या कडे इंन्डिया शायनींग हे असले प्रकार चालू झाले ना तेव्हा मला खात्री पटली की आपला शेतकरी आता अजुनच मागे पडनार. कारण विकसित व्हायची कल्पना अशी की, नुसता म्हणा, म्हणत राहा एके दिवशी लोके खरच मानतील. देशातल्या शेतकर्य्ंचे अस्तित्वाचे प्रश्न न सोड्वता इंडिया शायनिंग कसा होनार. साधे एक धरण नाही बांधता येत सरकार ला, बांधले तर उद्घाटण कोण करणार म्हणून बंद. होय हे खर आहे... कनाल.... बांधले त्यच्यात आम्ही किती वर्षे क्रिकेट खेळलो.. कुठला पाणी आनी कुठला काय... पण जेव्हा योजना मंजुर झाली होती तेव्हा शेतकर्यानी पेढे साखर वाटली होती.. पाणी येणार म्हनून...शेजारच्या देशाना अब्जो रुपयांची मदत देतो संबंध वाढवन्यासाठी म्हणे... तेच पैसे पाण्याची सोय करायला नाही वापरणार. आपल्याला कशाला मिरवायला पाहिजे जेव्हा घरात लोके उपाशी मरत आहेत... काय माहिती......