बर्डबाथ म्हणजे बेसिनच्या आकाराचे पाण्याचे उथळ भांडे असते ज्यातल्या पाण्यात पक्षी आंघोळ करू शकतात आणि ते पाणी पिऊही शकतात.
'बर्डबाथ' हा इंग्लिश शब्द मला तितकासा रुचला नाही कारण त्यातून 'पाणी पिण्याचा' वापर ध्वनित होत नाही. पाखरांसाठी हे दोन्ही अर्थ एकाच शब्दातून छानसे ध्वनित होतील असा काही मराठी प्रतिशब्द शोधता येईल का? असे मनात आले आणि मी मनोगतावर आले.
पाखरप्याऊ हा शब्द मनात घोळतोय पण त्यातून आंघोळीचा पर्याय ध्वनित होत नाही.