लेखात मला माहिती नसलेल्या बऱ्याच गोष्टी समजल्या आणि त्या वाचायला आवडलेदेखील. 'करवंदांचे लोणचे' हा प्रकार पहिल्यांदाच वाचला मी.. रेसिपी माहिती असल्यास देऊ शकाल का?
मला तसं चहा, कॉफी, दूध यातलं काहीही चालतं पण आवडीचाच प्रश्न निघाला तर दूध (धारोष्ण मिळाल्यास क्या कहने! ) पहिल्या क्रमांकावर (दूध दूध दूध है वंडरफुल, पी सकते है रोज ग्लासफुल! ) आणि कोल्ड कॉफी दुसऱ्या. पावसात चिंब भिजल्यावर कोल्ड कॉफी प्यायला मला प्रचंड आवडते.