न सोललेल्या नारळाला आम्ही असोल्या नारळ म्हणतो पण असोल्यातून पक्का नारळ निघतो, शहाळे नाही.
मध्यम आकाराच्या कैऱ्या मिठाच्या पाण्यात उकडायच्या आणि फेटलेल्या मोहरीत घालून मुरवायच्या की झाला उकडांबा - यामध्ये 'फेटलेल्या मोहरीत' म्हणजे नेमके काय ते वाइस बैजवार सांगा ना.
बाकी पत्ते खेळताना भिडूकडेही हुकुमाची पाने नाहीत कळल्यास दोन्ही डोळे चकणे करून छताकडे बघायचो.. कारण काही बोललो तर विरोधी पार्टीसमोर फुकाचा इज्जतीचा पंचनामा. गपगार राहून खाणाखुणांनी बोलणेच काय ते सुरक्षित.