बऱ्याच दिवसात न वापरल्याने शब्दप्रयोग विस्मरणात गेला होता.  चिमणीची आंघोळ नाही, तर कावळ्याचीच !  पुन्हा आठवण करून दिल्याबद्दल आभार.
आता बर्डबाथसाठी  वेगळा शब्द शोधावा लागणार. पक्षिकुंड म्हटले, तर भले मोठे कुंड नजरेसमोर येते. तबक किंवा स्तबक म्हटले तर फारच छोटे पात्र असल्यासारखे वाटते,  त्यामुळे मध्यम आकाराच्या कुंडासाठी सुचलेला डोणी हा शब्द विचारात घेता येईल.  डोणी म्हणजे इंग्रजीत बेसिन.

पक्षिद्रोणी किंवा पाखरडोणी?

बर्डबाथवर पक्षी फक्त आंघोळच करत नाहीत तर पाणीही पितात,  त्यामुळे पक्षिद्रोणी हा शब्द योग्य वाटतो. (जलदाणी जास्त सोपा व चांगला होता, पण तो पक्षिस्पेसिफिक नव्हता, एवढेच. )