डॉ.मोरे यांचे संपूर्ण भाषण मी वाचलेले नाही. तथापि, त्यांच्या भाषणात बहुधा काळखंडाचा उल्लेख होता. एखादा प्रवाह स्थिर होण्याकरिता दीर्घकाळ त्यात लेखन केले जाणे गरजेचे असते, अाशयाचे विधान त्यांनी केले आहे, असे वाटते. त्याला अनुसरूनच 'संतसाहित्य हेच खरे साहित्य' असे विधान त्यांनी केले असावे. इ.स.अकराशे ते इ.स.सतराशे हा सुमारे सातशे वर्षांचा प्रदीर्घ काळ (साधारण ज्ञानेश्वर ते तुकाराम) त्यांनी गृहित धरला असावा.
अर्वाचीन साहित्याची सुरुवात होऊन शतकाचा काळ लोटला आहे. यापुढे कमीतकमी सातशे वर्षे अर्वाचीन साहित्य लिहिले गेले तर अर्वाचीन काळातील साहित्य आठशे वर्षांचे होईल. त्यामुळे भविष्यात "अर्वाचीन साहित्य हे खरे साहित्य' असे म्हटले जाईल का, असा प्रश्न मनात आला.
अर्थात, जे घडेल ते पाहायला आपण नसू.