पॅटर्न चे दोन अर्थ घेता येतात...
१. आकृतिबंध, आकार -
उदा. साडीवरचा फुलांचा पॅटर्न
उदा. स्थलांतरी पक्ष्यांनी उडताना केलेला थव्याचा आकार.
हे शब्द ज्याचे भौमितीक माप (लांबी, रुंदी, अथवा क्षेत्रफळ) काढता येईल त्यांना लागू होतो.

२. शैली, ढब, पद्धत, तऱ्हा
उदा. बिहेव्हीअरल पॅटर्न

वरदाताईंना दुसरा अर्थ अभिप्रेत आहे असे दिसते. कारण वाऱ्याचा/ची/चे आकृतिबंध/आकार/लांबी/रुंदी/क्षेत्रफळ बदलला/ली/ले हे संयुक्तिक वाटत नाही.

पण वाऱ्याची शैली/ढब/पद्धत/तऱ्हा बदलली हे त्यापेक्षा बरेच बरे वाटते.

तुम्ही दिलेल्या दुव्यात महेशरावांनी "ढब" सुद्धा सुचवला आहे.