"वारकरी संप्रदायातून निर्माण झालेलं साहित्य हेच खरं साहित्य".

असे आपण उद्धृत केलेले आहे. मूळ भाषणाचा दुवा दिलेला आहे. दुव्यातील उतारे नीट वाचल्यावर लक्षात येईल की

"वारकरी संप्रदायातून निर्माण झालेलं साहित्य हेच खरं प्रातिनिधिक साहित्य".

स्पष्ट आहे की आपल्या अवतरणातून प्रातिनिधिक हा शब्द गाळला गेलेला आहे.

इंग्रज येण्यापूर्वीच्या वर्णव्यवस्थेतील गुरुकुल पद्धतीत ब्राह्मणेतर समाजात शिक्षणाचे प्रमाण नगण्यच असावे. इंग्रज सत्ताकाळात ब्राम्हणेतर समाजाला शिक्षणाची सोय उपलब्ध झाली खरी परंतु शिक्षणाचे प्रमाण अत्यल्पच राहिले. त्यामुळे त्या समाजातून आलेले लेखनही नगण्यच राहिले.

उल्लेख केलेले लेखक हे ब्राह्मण समाजातील असल्यामुळे त्यांनी केलेले लेखन हे प्रातिनिधिक नसावे असे मोरे यांना वाटले असावे.