वारकरी संप्रदायातून निर्माण झालेलं साहित्य हेच खरं साहित्य हा मुद्दा लेखात तीन वेळा आला आहे. पैकी दोन जागी "प्रातिनिधीक" हा शब्द नाही. १ - सदानंद मोरे यांच्या फोटो शेजारी निळ्या अक्षरात मथळा. त्यात "प्रातीनिधिक" हा शब्द नाही.  आणि २- पाचव्या परिच्छेदाच्या शेवटी, एका शीख पोलिसाचा फोटो आहे त्याच्या थेट वर. इथे पण "प्रातिनीधिक" हा शब्द नाही. तेव्हां, अवतरणातून प्रातिनिधिक हा शब्द गाळला गेलेला आहे. असे म्हणता येणार नाही. 

आणि जरी हा शब्द असला, तरी माझा मुद्दा कायम राहतो. मी उल्लेख केलेले लेखक ब्राम्हण होते का इतर काही होते, यांच्याशी त्यांच्या साहित्याचा काहीही संबंध नाही, व मला त्यांच्या जात-धर्माशी काहीही देणे घेणे नाही. मी पंडित रवी शंकर, भीमसेन जोशी  यांना जितके मानतो, तितकेच उस्ताद विलायत खां, उस्ताद सलमात अली नजाकत अली  यांना पण मानतो. कारण त्यांची कला उच्च कोटीचे होती. माझी भक्ती त्यांच्या कले करता आहे, व्यक्तीशी किंवा त्या व्यक्तीच्या जात-धर्माशी नाही.

शेक्सपीयर किंवा जॉर्ज बर्नार्ड शॉ प्रोटेस्टंट होते का कॅथॉलिक, का ज्यू होते, याचा कोणी कधी मुद्दा केला? आणि जयवंत दळवी यांची पहिलीच कादंबरी जी गाजली (चक्र) ती काय ब्राम्हण समाजाची प्रातीनिधिक होती? द मा मिरासदार, यांच्या कोणत्या पुस्तकात सदानंद मोरे यांना ब्राम्हण समाज दिसतो? जीए यांच्या कथा काय ब्राम्हण समाजाचे वर्णन सांगतात ? उगाच आपले काहीतरी.