कोर्ट या सिनेमाला शेवट काय आहे हे एक गूढच वाटले . त्यासाठी त्याला सुवर्ण कमळ दिले की काय कळत नाही. सिनेमाचा अचानक होणारा शेवट फारच भावला (? ) . आश्चर्य हे आहे की खालील  पैकी नक्की काय दाखवायचे आहे : 

                        १) कोर्टाचं दैनंदिन कामकाज कसं चालतं. 
                        २) सामान्य माणसावर गहन आरोप ठेवण्यात सरकारला स्वारस्य आहे की काय ? 
                        ३) कोर्टाची केस वर्षानुवर्ष चालते. (नाहीतरी आरोपीचा वकील त्याला हॉस्पिटल मध्ये सांगतोच)
                        ४) फालतू कारणासाठीही कोर्टाची केस साधारण माणसावर होऊ शकते. 
                        ५) साधारण माणसाने त्याच्या पायरीच्या चाकोरीतच राहिले पाहिजे.
                        ६) न्यायाधीश, वकील यांनाही खासगी जीवन आहे. कोर्टाच्या केसशी त्यांना काहीही देणंघेणं नाही. आरोपीचं काहीही होवो. त्यांच्या खासगी जीवनावर उर्वरीत सिनेमा बेतला असता तरी चाललं असतं. बिच्चारे मराठी प्रेक्षक काहीही सहन करू शकतात. 
                        ७) आरोपीचा वकील जामिनाचे पैसे भरतो. गुजराथी माणसांना जास्त माणुसकी असते असं असावं. 
                        ८) केवळ एका शाहिराने सफाई कामगारांना जीव द्यायला सांगितलं, म्हणून एक सफाई कामगार आत्महत्या करतो. सरकार एवढं केव्हापासून संवेदनाशील झालं. कुणास ठाऊक. आणि काव्य इतकं गंभीरतेने कधी पासून लोक घ्यायला लागले ., 
                        ९) आश्चर्य म्हणजे आरोपीचं शेवटी काय झालं. काहीच कळत नाही. ज्याच्या व्र बराच खर्च करून सिनेमा काढला. 
                      १०)इतके सरकार जर संवेदनाशील असेल तर केजरीवाल यांच्यावरही ताबडतोब केस करायला हवी . 
                      ११) सध्या मराठी सिनेमाची गंगा वाहत आहे तीत हात धुऊन घ्यावेत असा निर्मात्याचा हेतू तर नाही ?      
                       १२) सुवर्ण कमळ काय , हा सिनेमा ऑस्करलाही जायला हरकत नाही. 
               असे आणि अनेक मुद्दे आपणही यात घालू  शकता.