अ मॉकिंग बर्डचा उल्लेख आढळला आणि त्या वाचनातून मिळालेला अपूर्व आनंद आठवला. काही पुस्तके कायम मनात घर करून राहतात.
फारच सुंदर आहे ही कादंबरी. भुताच्या भीतीने बू रॅडली घरासमूर पळणारी आठ वर्षांची मुलगी, काळ्या मजुरांचे खटले विनामूल्य लढवणारे तिचे वडील आठवले. तकलादू समाजसेवा करणार^या स्त्रियांच्या आचरट गप्पा, सारे आठवले. आता पुन्हा एकदा वाचावीशी वाटते आहे.
स्मृतीचित्रे पण तशीच. आपल्याला कुणीतरी पत्र पाठवावे अशी लक्ष्मी बाईंना वाटणारी इच्छा, गडकरींनी लक्ष्मीबाईंना लिहिलेले अरुंद लांबलचक पट्टीच्या आकारातले पत्र, त्या पत्रातली गंमत जंमत, लक्ष्मीबाईंचे पारदर्शी नितळ मन, त्या उभयतांचा अव्यवहारीपणा, सारे आठवले आणि सारे एकदा पुन्हा वाचावे असे वाटायला लागले आहे.
सुंदर पुस्तकांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.