पावणेचार वर्षे, ४३ भाग, सर्वार्थाने मराठी आंतरजालावरची सर्वाधिक काळ चाललेली कथामालिका वाचण्याचे भाग्य मला लाभले. याबाबत आंतरजालावरील एक वाचक म्हणून मला माझ्या वाचन प्रवासाचे सार्थक झाले असे वाटत आहे.
दर वेळी पुढच्या भागाची उत्कंठ वाटायची ती भावना आता नसणार याची हुरहूर लागली आहे.
परिस्थितीने सरळमार्गावरून भरकटवलेल्या सामान्य माणसाच्या कथेचा सुखांत भावला.
काकांखेरीज, रमेश, नीता, साधना व सोना ही सर्व पात्रे खूप ओळखीची झाली.