जर श्री. सदानंद मोरे यांचे वाक्य  'वारकरी संप्रदायाचे साहित्य हेच खरे प्रातिनिधिक साहित्य'  असे असेल तर. . . .
त्यांचे वाक्य तसे नाही. त्यांनी "प्रातिनिधिक" हा शब्द वापरलेला नाही. 
आधुनिक मराठी साहित्याचा काळ फारच अल्प आहे त्यामुळे . . . .   पण ते आधुनिक मराठी वगैरे जे काही आहे ते साहित्य असेल तरच त्याच्या मूल्य मापनाचा प्रश्न येतो. जर ते खरे सहित्य नसेलच, व निव्वळ छापील कागद असतील, तर कसले मूल्य आणि कसले मापन?  मी इंजीनियर आहे, कॉलेजात साहित्य वगैरे शिकवितात तसे रीतसर मी काही शिकलेलो नाही. आत्ता पर्यंत मला असे वाटत होते कि सहित्याचे प्रकार कादंबरी, कथा, लघुकथा, चरित्र, प्रवास वर्णन, इत्यादी असतात.  खरे साहित्य, खोटे सहित्य, बनावटी साहित्य, तोतया साहित्य, तथाकथित साहित्य, वगैरे असे ही प्रकार असतात हे मला माहीतच नव्हते.