प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मूळ बंगाली कथेचे नाव 'समाद्दारेर चाबी' असे आहे. परंतु 'चाबी' ह्या बंगाली शब्दाचे किल्ली ह्याव्यतिरिक्त आणखी काही अर्थ आहेत का हे कुणाला तरी विचारायला पाहिजे. मला बंगाली येत नसल्याने मूळ कथा मी वाचलेली नाही. इंग्रजी भाषांतरात भाषांतरकर्तीने key हा शब्द वापरला आहे. राधारमण समाद्दारांनी जेव्हा माझं नाव...किल्ली असं म्हटलं तेव्हा त्यांनी रहस्याचा उलगडा करणारी गोष्ट अशा अर्थाने किल्ली हा शब्द वापरला असावा असे मला वाटते. वाद्याच्या keys असे फेलूदाला वाटले तरी मला तसे वाटले नाही. पण भाषांतर करताना त्या बाबतीत स्वातंत्र्य घेणे मला योग्य वाटले नाही.
कथेच्या भागांबद्दल : मूळ कथेत जसे भाग केले आहेत त्यानुसार मी भाग केले आहेत. एक तिसरा भाग सोडला तर बाकीचे भाग तसे मोठेच आहेत. दुसरा भाग खूप मोठा आहे. तो संपूर्ण भाग मनोगताने स्वीकारला नाही. जतन करणे शक्य नाही. प्रशासकांकडे विचारणा करावी. अशा अर्थाचा संदेश आला. तो लिखाणाच्या आकारमानामुळे आला की आणखी काही तात्कालिक कारणामुळे आला हे कळले नाही. पण तो आकारमानामुळे असेल असा अंदाज करून मी त्याचे दोन भाग केले.
प्रतिसादाबद्दल आणि स्वारस्याबद्दल पुन्हा एकदा आभार.