प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अशोक जैन यांनी फेलूदाच्या कथांचे अनुवाद केले आहेत हे मला माहीत नव्हते. आता ती पुस्तके शोधली पाहिजेत! परंतु अशोक जैन यांनीच शरदिंदु बंद्योपाद्याय यांच्या व्योमकेश बक्षीच्या कथांचे मराठी भाषांतर केले आहे. अशी भाषांतरित तीन पुस्तके माझ्याकडे आहेत. पण फेलूदाच्या मराठीत भाषांतरित कथा मात्र माझ्या वाचनात फारशा आल्या नाहीत.