कथा आणि अनुवाद आवडले. अनुवाद हा साहित्यप्रकारच आता हळूहळू संपत चालला आहे की काय असे वाटत असताना असले बावनकशी अनुवाद वाचले की बरे वाटते. अर्थात फेलुदा काय किंवा ब्योमकेश बक्षी काय (तसा होम्सही काय) - हे सगळे जुन्या जमान्यातले नायक असल्याने त्यांच्या कथांमधील रहस्यांत आता एक साचलेपणा जाणवतो.(कदाचित फार वेळा त्यांची- विशेषतः होम्सची- पुस्तके वाचल्यानेही हे झाले असेल) पण मला वाटते, सर्वच साहित्यप्रकारांमध्ये हे होत असावे. (उदा. लघुनिबंध. खांडेकरांचे लघुनिबंध- जे कोणे एके काळी झपाटल्यासारखे वाचले- ते आता हातात धरवत नाहीत. वपु, अर्नाळकर,शन्नांची पुस्तके ही अशीच उदाहरणे. कवितांबाबतही असे होते. ) अपवाद म्हणून अर्थात दिवाकरांच्या नाट्यहटा, बहिणाबाईंच्या कविता असे लिहिता येईल. असो, हे विषयांतर झाले.
त्यामुळे, मीराताई, एक नम्र सूचनाः मूळ कथेचा गाभा तसाच ठेवून त्या कथेचे आधुनिक रुपांतर करता येईल का? (ताजमहालाला विटा वगैरे मान्य करुन! ) तसे करताना अधिक मजा येईल का? असा एक प्रयत्न पूर्वी मी केला होता, हे कदाचित तुम्हाला ठाऊक असेल. त्याचा दुवाः
दुवा क्र. १
पण एकूण फेलुदांची बऱ्याच दिवसांनी भेट झाली, बरे वाटले.