चौकस यांच्या लिखाणाचा मी भीषण चाहता असल्याने ('निळ्या काचेचे पेन') त्यांच्याशी असहमत होण्याचा घनघोर प्रसंग कधी येणार नाही, असा माझा समज होता, किंवा अजूनही आहे. पण याला जीवन ऐसे नाव. 'पिकू' मलाही आवडला आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचाही भीषण चाहता असून 'संपूर्ण चित्रपटापैकी ऐंशी टक्के अमिताभने स्वतः खेचला आहे' हे काही पटले नाही.  मौशुमी चॅटर्जीला दहा टक्के हे तर तिची 'सेवा ही पूर्वीची स्मरोनी'च दिल्यासारखे वाटले. इरफान आणि दीपिकावर चौकस यांची अवकृपा का हे काही कळाले नाही. राहता राहिला भाग अमिताभच्या बंगाली बेअरिंगचा. पण त्यात नवल ते काय? ऐंशीच्या दशकात मनमोहनी माकडचाळे  विश्वास बसावा अशा पद्धतीने साकारणारा हा अभिनेता. 'दी ग्रेट गँबलर' हा चित्रपटही तीनदा बघणाऱ्या आमच्यासारख्यांना त्याच्याकडून यापरती अपेक्षाच नाही.