मूळ कथेचा गाभा तसाच ठेवून त्या कथेचे आधुनिक रुपांतर करता येईल का? ....
सूचना विचाराधीन. (हे काम तसे आव्हानात्मक आहे तरीही! )
अशा रूपांतरांची उत्तम उदाहरणे म्हणजे आचार्य अत्र्यांचे 'कवडीचुंबक; तसेच पुलंची 'अंमलदार' आणि 'ती फुलराणी'.
साचलेपण. : साचलेपण येण्याचे एक कारण (जे तुम्हालाही पटले आहे) म्हणजे पुन्हा पुन्हा वाचणे! मी पुल इतक्या वेळा वाचले आहेत की एके काळी 'पुलंनी लिहिलेली प्रत्येक ओळ चांगलीच असते अशी माझी श्रद्धा आहे' असे वाटणाऱ्या मला काही वर्षांपासून पुलंच्या लिखाणातील तोचतोचपणा जाणवायला लागला आहे.
तुम्ही दुवा दिला आहे ती गोष्ट मी वाचली नव्हती. आता सावकाश वाचून प्रतिसाद देईन. (सावकाश अशासाठी की तिचे चार भाग आहेत.)