श्री मिलिंद फणसे , इतका चांगला लेख आपण अनुवादित केलात त्याबद्दल अतिशय आभारी आहे. या लेखातील काही काही वाक्य तर
अतिशय महत्त्वाची आणि वेगळाच विचार करायला लावणारी आहेत. हा लेख चारपाच वेळा तरी वाचावा लागेल असे वाटते. थोडा भाषेचा
प्रश्न आहे . म्हणजे उच्च मराठी वाचण्याची सवय नाही असे नाही, पण कल्पना लवकर करता येत नाहीत. तरीही मूळ इंग्रजी लेख छापलात तर
जास्त बरं होईल असे वाटते. म्हणजे कधी कधी इंग्रजी भाषेतले शब्द एकदम चपखल कल्पना देतात तर कधी मराठीतही . असो. अतिशय चांगला लेख आहे. लिखाण हे उत्तरोत्तर सुधारत जातं की काय असं वाटतं, त्यामुळेच मि.. हॅरॉल्ड म्हणतात की "प्रत्येक नाटक (मी तर म्हणेन प्रत्येक लिखाण हे एक अपयश आहे, म्हणून तर नवीन नवीन लिहावंसं वाटतं ) एक अपयश होतं " हे पटण्यासारखं आहे. जी वाक्य नवीन कल्पना देतात
ती परत लिहिण्यात अर्थ नाही. पण विचार अतिशय वेगळे आहेत असं मला तरी वाटतं. असे विचार कधी केलेले नाहीत असं नाही, पण दुसरं कोणीतरी पण आपल्यासारखेच काही विचार तरी करतात हे पाहून बरं वाटतं.