मी आपल्या लिखाणाशी सहमत आहे. पण ही अगदी साधी बाब आहे. बऱ्याच वेळेला माणसं काही नाही जमलं तर आपल्या मोठ्या वयाचा
आधार घेऊन बाकीच्यांना गप्प बसवतात. साधारणपणे अशा चर्चेत उरलेले लोक दुसऱ्याचा अपमान चार लोकांमध्ये करीत नाहीत आणि अनावश्यक पर्याय स्वीकारून वाद बंद करतात. सुरुवात चर्चेने होऊन त्याचे वादात रुपांतर कधी होते ते बऱ्याचदा समजत नाही. पण दुसऱ्यापेक्षा
मी श्रेष्ठ आहे आणि माझ्या तोलाचे विचार इतरांना सुचू शकत नाही असा (गैर) समज असल्याने असे होत असावे. पण भले भले ज्ञानी लोक या
विचारांनी ग्रासले जातात. याला उपाय काही नाही. तुम्ही सुधारलात तरी दुसरे सुधारतील याची खात्री देता येत नाही. कारण बदल म्हणजे एक पायरी खाली येणं आहे. ते कोणालाच नको असते.