- एक लाखाचे दागिने घेण्याची ऐपत ही काही फार मोठी बाब नाही. आयुष्यभर पै-पै गोळा करून किंवा संपत्तीचा एखादा हिस्सा विकून किंवा कर्ज काढून मुलीच्या लग्नासाठी २-४ तोळे आयुष्यात एखाद वेळी खरेदी केले जाऊ शकते.
- आयकर लागू करन्याला शेतकऱ्यांचा विरोध नाही. पण त्याच्या घरी आय तर येऊ द्या. घेणं ना देणं, उगीच कंदील लाऊन जाणं कशाला?
- उद्योग धंध्या करता कर्ज घेतले आणि घरात खायला अन्न नाही तर तो धंदेवाईक चारसहा महिने उपाशी राहून उद्योग उभा करू शकेल काय? मुलगा बिमार पडला तर त्याला उपचार न देताच मरू देईल मात्र उद्योग उभा करेलच, असे होईल काय?
शेती हा धंदा तोट्याचा झाल्याने भांडवल खाऊन जगणे, अपरिहार्य आहे.
- मुळात कर्जफेडीची ऐपत नसलेल्या शेतकऱ्याला कर्ज देणे, हाच कायदेशीर गुन्हा आहे आणि हा कायदेशीर गुन्हा सरकार व बँका कायदेशीरपणेच करत आहेत.