मराठी भाषेत जागतिक दर्जाचे लेखन होत नाही अशी खंत व्यक्त होते ती अकारण आहे. याच संकेतस्थळावर मराठी भाषेतल्या आजपर्यंतच्या सर्व साहित्यामधील सर्वोत्तम म्हणता येतील अश्या दोन कविता आहेत, यावे राजसा.. आणि गहिरा धुंदावलेला चंद्र. इतर कवींनी या दोन कवितांमधून बरेच काही शिकण्यासारखे आहे. या थोर कवी/कवयित्रीने मनोगतावर यापूर्वीही कवितांच्या ढासळत्या दर्ज्याबद्दल मनोगतावरील कविता या दुव्यावर चिंता व्यक्त केली होती. आज सुमारे साडेचार वर्षांनंतरही कवी यातून काहीच शिकत नाहीत, यामुळे प्रतिसादलेखक व्यथित होणे स्वाभाविक आहे.