'मजबूर' हा चित्रपट मी पाहून जवळ जवळ २८ वर्षे झाली. मला बिनचूक आठवत असेल असे नव्हे; पण ह्या चित्रपटात शेवटी मोटारींचा पाठलाग दाखवलेला आहे. तो जसाच्या तसा एका विदेशी (बहुदा 'कोल्ड स्वेट' ह्या) चित्रपटातून उचललेला आहे (सांगतात). तसे असेल तर ती मोटार परदेशातली (डावीकडे सुकर्णचक्र असलेली) असेल आणि तीच चित्रपटात सगळीकडे दाखवणे गरजेचे झालेले असेल, म्हणून ती वापरली असावी, असे वाटते.

माझ्या वरील विधानात विस्मृती, कमी माहिती इ. मुळे तपशीलाच्या/तर्काच्या अनेक चुका असतील. चू. भू. द्या. घ्या.

डावीकडे सुकर्णचक्र असलेल्या कित्येक जीपगाड्या मी भारतात पाहिलेल्या आहेत. (अर्थात त्यांवर 'सुकर्णचक्र डावीकडे' असे स्पष्ट लिहिलेले असे, हे मात्र खरे. )