कथेचा बाज आध्यात्मिक आहे आणि आध्यात्मात काम हा प्रथम रिपू समजला गेलायं पण वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.

सर्व व्यक्त जगाच्या निर्मितीची प्रक्रियाच काम असल्यानं ती व्यक्त जगाची आधारभूत मूल प्रक्रिया आहे. निसर्गानं ती प्रक्रिया अव्याहत चालू राहावी यासाठी त्यात सर्वोच्च आनंद ओतप्रोत भरला आहे. कथेतून या द्विधेची कशी सोडवणूक केली जातेयं हे पाहणं रोचक असेल.