<< पण कॉलेजमध्ये म्हणून जी शुभांगी दाखवली आहे तिचे प्रयोजन कळले नाही. एकतर
नरभक्षक टोळीच्या तोंडाला पाणी सुटावे अशी गुटगुटीत असलेली ती मुलगी आणि
मोठेपणाची शुभांगी यांच्या वयांमध्ये फारसा फरक मला तरी जाणवला नाही. >>
चित्रपट परीक्षणात चटपटीतपणा आणण्याच्या प्रयत्नात महिलांचा अवमान करणारी ही वाक्यरचना टाकणे अनावश्यक आहे असे माझे मत.
<< शुभांगी कुडाळकर या "कडक, मसालेदार माला"विषयी पुस्तक लिहिण्याचे काम तो प्रकाशक त्याच्या एका लेखकाला देतो. >>
ही वाक्यरचनाही चित्रपटात आहे की तुमच्या मनाची? असो. खटकली एवढे नमूद करू इच्छितो.