असच असतं. साधारण माणसाने रस्त्यावर विकायला ठेवलेली वस्तू विकत घेण्यात माणसाचा इगो दुखावला जातो की काय , कोण जाणे. तसच त्याचं महत्त्वही नसतं. तीच वस्तू मोठ्या दुकानातून जास्त किंमतीला सहज विकत घेतात. माझा एक असाच अनुभव आहे. आमच्या जवळच एक गृहस्थ  राहत होते त्यांना एकदा तांब्याचा नाग घरच्या  शंकराच्या पिंडीसाठी हवा होता. तोही छोटा. मी त्यांना म्हंटलं , " अहो 
बुधवारच्या बाजारात बऱ्याच हाताने बनवलेल्या वस्तू असतात , त्यात  तुम्हाला तांब्याचा नाग सहज मिळेल, तोही स्वस्तात आणि उत्तम असू शकेल. तशाही दुकानात मिळणाऱ्या वस्तू एकाच प्रकारच्या असतात . "   त्यावर त्यांनी रागाने उत्तर दिले, " अजून अशी  रस्त्यावरून वस्तू
विकत घेण्याची वेळ आली नाही, हे लक्षात ठेव. " मी त्यांना समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही.