कथेच्या मध्यावर शेवटाच्या अनेक शक्यता दिसू लागल्या होत्या. कसे की पुष्कळ लोक त्या बैलगाडीसाठी मेहुणीकडे मागणी नोंदवतात. खूप विक्री होते, मग राजमानेच मार्केटिंग सुरू करतात. मग फार्म हाउस ऊर्फ रिसॉर्ट बनवतात, तिथे दर्शनी भागात ती पहिली छोटी बैलगाडी आणि तिचीच वापरता येण्याजोगी मोठी प्रतिकृती कृतज्ञतेने ठेवतात, पुढे मेहुणीचे महत्त्व कमी होते, राजमाने स्वतःच सर्व ताब्यात घेतात, घरात कलह वगैरे. किंवा साहेब ती बैलगाडी बघून स्वतःच तिचे उत्पादन सुरू करतात, धंदा उत्तम चालतो, राजमानेंना चांगल्या पगारावर साहाय्यक म्हणून घेतात, मेहुणीचा धंदा बसतो, घरात कलह वगैरे.
अनेक शक्यता आणि शेवटी मेहुणीमुळे घरात कलह. ओ हेन्रीच्या त्या सुप्रसिद्ध तलवारीच्या गोष्टीसारखे!
(हे आपले इनोदासाठी, ) कथा आवडली हे खरे.