१- माझ्या माहीती प्रमाणे स्टीअरिंग व्हील उजवी कडेच असायला हवे, असा कोणताही नियम नाही. तुम्ही "वामहस्तचालित" गाडी आयात करून रजिस्टर करू शकता.
२- जरी असा नियम असला, तरी तो वास्तवा करता असेल. सिनेमा हे वास्तव नव्हे. ते फिक्शन आहे. कादंबरी सारखेच. फिक्शन मध्ये काहीही असू शकते. अन्यथा स्टार ट्रॅक, ज्यूरेसिक पार्क इत्यादी सिनेमे होऊच शकले नसते. फॅण्टसी हा फिक्शन मधला उपप्रकार आहे. फॅण्टसी मध्ये बिना स्टीअरिंग व्हील ची गाडी पण असू शकते. ती उडू पण शकते.
३- चित्रपट परीक्षण महामंडळाचे काम काय या बाबत तुमचा प्रचंड गैर समज आहे. त्यांचे काम चित्रपटात काही जनक्षोभ भडकावणारे, कुणाच्या भावना दुखावणारे, समाजात भांडणे लावणारे, काही चुकिचा संदेश देणारे (जसे - धूम्रपानाचे उदात्तीकरण) इत्यादी नाही, हे पाहणे येवढेच आहे. सिनेमा वास्तवाला धरून आहे का हे पाहणे त्यांचे काम नाही. कारण फिक्शनला वास्तवाला धरून असण्याची काही जबाबदारीच नाही. (उद्या तुम्ही विचाराल सिनेमात अमूक वर्षांचा अवधी दाखवला, पण अमिताभ बच्चन एकदा पण केस कापायला गेलेला, किंवा टमरेल घेऊन गेलेला, दाखविला नाही. चित्रपट परीक्षण महामंडळाचे काय झोपले होते का? )
४- मला तर असा पण एक सिनेमा आठवतोय, नाव आठवत नाही, ज्यात हीरो परदेशी जाताना दाखवला आहे. तो ज्या विमानात बसतो ते बोइंग ७०७ आहे, मग त्या विमानाचा उडताना शॉट आहे ज्यात ते विमान कॉमेट 4C आहे, व शेवटी उतरतानाचा शॉट आहे ज्यात ते विमान DC-10 आहे. इतर सिनेमातून शॉट कट-व-पेस्ट केलेले आहेत. फिकशन आहे, म्हणून चलता है.