माझ्या माहीती प्रमाणे स्टीअरिंग व्हील उजवी कडेच असायला हवे, असा कोणताही नियम नाही. तुम्ही "वामहस्तचालित" गाडी आयात करून रजिस्टर करू शकता. -
- अशी डावीकडे सुकाणू असलेली गाडी भारतातच बनवता येते का ?
माझ्या प्रश्नाला एक उपप्रश्न होता, जो मी विचारलेला नव्हता. येथे विचारतो.
जरी असा नियम असला, तरी तो वास्तवा करता असेल. सिनेमा हे वास्तव नव्हे. ते फिक्शन आहे. - आपल्याकडे गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवली जाते. उजव्या बाजूला सुकाणू असलेल्या चालकाला उजव्या बाजूच्या आरशातून मागे असणाऱ्या गाड्या दिसू शकतात. तेव्हा उजवीकडे वळतानाचे नियोजन तो व्यवस्थित करू शकतो. डाव्या बाजूला सुकाणू असेल तर गाडीच्या उजव्या बाजूला किंवा उजव्या बाजूच्या मागे असणाऱ्या गाड्या डाव्या बाजूला बसलेल्या चालकाला दिसू शकतात का ?
नियम वास्तवाकरिता आहे, असे गृहित धरू. चित्रपट बनविणाऱ्या एखाद्याने स्वतःच्या "फिक्शन" चित्रपटातील सर्वच वाहनांना डाव्या बाजूचे सुकाणू चक्र आहे असे दाखवले आणि तसे दाखवल्यास त्याचा परिणाम म्हणून एखाद्या तरूणाने "वास्तवा" त स्वतःचे सुकाणू डाव्या बाजूला करून घेतले तर अपघाताची शक्यता वाढेल का?