माझ्या मर्यादित अनुभवानुसार मी ही माहिती देत आहेः
अशी डावीकडे सुकाणू असलेली गाडी भारतातच बनवता येते का?
मागे टेल्को कंपनीने अशा बसगाड्या (निर्यातीसाठी किंवा विमानतळावर वापरण्यासाठी असाव्यात... नक्की माहीत नाही) बनवलेल्या आणि परीक्षणार्थ पुण्याच्या रस्त्यावरून फिरवलेल्या मी पाहिलेल्या आहेत.
आधी लिहिल्याप्रमाणे डावीकडे सुकर्णचक्र असलेल्या जीपगाड्याही मी पूर्वी पुण्यात (तुरळक) पाहिलेल्या आहेत... मात्र त्यांच्या मागच्या बाजूला 'सुकर्णचक्र डावीकडे' अशी सूचना लिहिलेली असायची.
तेव्हा हो. 'अशा गाड्या भारतात बनवताही येतात आणि चालवताही येतात' असे तत्त्वतः म्हणता येईल
डाव्या बाजूला सुकाणू असेल तर गाडीच्या उजव्या बाजूला किंवा उजव्या
बाजूच्या मागे असणाऱ्या गाड्या डाव्या बाजूला बसलेल्या चालकाला दिसू शकतात
का?
हो. जे उजव्या बाजूने होते ते डाव्या बाजूनेही (त्यातल्या मर्यादांसकट) होते. आरश्यांची जुळवणूक तसतशी करावी लागते.
एखाद्या तरूणाने "वास्तवा" त स्वतःचे सुकाणू डाव्या बाजूला करून घेतले तर अपघाताची शक्यता वाढेल का?
हे तितके सोपे आहे असे वाटत नाही
.......... पण समजा एकदम डाव्या बाजूच्या सुकर्णचक्राची गाडी आयात करून वापरली असे गृहीत धरले तर केवळ तेवढ्या कारणाने अपघाताची शक्यता फारच कमी प्रमाणात वाढेल असे वाटते.