सुकाणू कोणत्या बाजूला आहे याचा संबंध आरश्यात मागचे दिसण्याशी नसून चालकाने खिडकीतून हात बाहेर काढून वळण्याचे संकेत देण्याशी आहे. फार पूर्वी वळण्याचे इंडिकेटर फारशे रिलायेबल नव्हते. तेव्हां चालक खिडकीतून हात बाहेर काढून वळण्याचे संकेत देत असे. हा संकेत चालक ज्या बाजूला आहे त्याच बाजूला देता येतो. म्हणजे उजवी कडे सुकाणू असलेली गाडी फक्त उजवीकडे वळण्याचा संकेतच देऊ शकते, व डावी कडे संकेत न देता वळू शकते. म्हणून डावी बाजूने ओवेरटेक करायचे नाही असा नियम असतो. सुकाणू डावी कडे असणार्या गाड्यां वर मागच्या बाजूला "लेफ्ट हॅंड ड्रईव. नो सिग्नल" असे लिहिण्याची सक्ती असे. हल्ली कोणी हात बाहेर काढून संकेत देत नाही त्या मुळे सुकाणू कोणत्या बाजूला आहे त्याने फारसा फरक पडत नाही. पुण्यात तर असा नियम आहे कि चारचाकी चालकाने कोणत्याही प्रकारे काहीही संकेत दिला तरी त्या कडे पूर्ण दुर्लक्ष करायचे, व दुचाकी आपल्याला हवी तशी रेटायची.

सिनेमात बरेच काही असते - जसे काचेच्या तावदानातून काच फोडून उडी मारून पलीकडे जाणे; पाचव्या मजल्या वरून खाली रस्त्या वरून चालणार्या ट्रक मध्ये उडी मारणे;  धावत्या मोटारीच्या बोनेट वर उडी घेऊन चालकाशी मारामारी करणे; चालत्या आगगाडीच्या डब्यांच्या टपा वरून धावणे; दहा सशस्त्र गुंडां बरोबर निशस्त्र मारामारी करणे; ओळख पण नसलेल्या तरुणीशी रोमियोगिरी  करणे; कॉलेज मध्ये जाऊन अभ्यास सोडून इतर सर्व काही करणे;  . . . . यातील काहीही कोणी करायचा प्रयत्न केला तर डावी कडे सुकाणू असलेली गाडी चालविन्याने होईल त्यापेक्षा ही खूपच मोठा अपघात होईलच याची खात्री असावी.