१- महत्त्वाच्या मीटींग दोन प्रकारच्या असतात. आधी तारीख वगैरे ठरवून (प्लान्ड), व आकस्मिक. यातील आकस्मिक मीटींग ही नुकतेच काहीतरी घडलेल्या घटनेला रिस्पॉन्स असते. (शस्त्रक्रिये प्रमाणेच). अश्या घटना दिवसा घडण्याची शक्यता जास्त असते व म्हणून त्यांना रिस्पॉन्स संध्याकाळी होण्याची शक्यता जास्त असते.
२- मात्र अनेकदा असे होते कि हा रिस्पॉन्स उद्या केला तरी चालणार असते, पण काही अधिकर्यात उद्या पर्यंत थांबले तरी चालेल हा निर्णय घेण्यची कुवत नसते. काहींना असे ही वाटू शकते कि १२ तास लौकर केल्याने अपले हेड ऑफिस वर इंप्रेशन पडेल. वगैरे.
३- शेवटी, अशी मीटींग जेव्हां संध्यकाळी होते, ते तुमच्या लक्षात राहते, इतर वेळी होते ते लक्षात राहत नाही. जसे, ज्योतिष्याने सांगितल्या प्रमाणे घडले तर ते लक्षात रहते व आपण त्याची गावभर जहीरात करतो, पण तसे घडले नाही तर ते आपण विसरून जातो.