नुकताच पाहाण्याचा योग आला.....
काही जरा खटकलेल्या बाबी अशा...
अमृता घरी चुडीदार व 'टॉप' या 'आजच्या ' वेषात दाखवली आहे. चित्रपटाचा काळ बघता तो साधारण ८० ते ९० ( जेव्हा स्क्रीन्स ने आयुष्य काबीज केलेले नव्हते! ) असा असावा..... तर त्या काळातली आई बहुदा घरीही साडीच नेसेल किंवा फारतर पंजाबी ड्रेस व ओढणी घेईल.
...पाव भाजी चा जमानाही मला वाटतं ९० नंतरचाच!!
मासेमारी ला जाण्याचा प्रसंग मला तरी अनावश्यक वाटला.... आणि एकूणच चित्रपट फार संथ वाटला....
पण 'निवते' चे पात्र बेष्टच! एकदम सुयोग्य निवड... हे मीही घरी आल्यावर म्हटलं!
छायाचित्रणाला मात्र पूर्ण मार्क्स! पूर्ण सिनेमाभर पावसाळी हवा - ओल जाणवत राह्ते....