मनोगताच्या शुद्धिचिकित्सकात वर वर्णन केलेल्या (आणि तश्या अनेक इतर) शक्यतांचा विचार करून शब्दसंग्रह जोपासलेला आहे.
वर फक्त नामांचाच विचार केलेला दिसतो. मात्र शुद्धिचिकित्सकात नाम, सर्वनाम, विशेषण क्रियापद अशा सर्व प्रकारांतील 'सामान्यरूपांचा' विचार करून शब्द जोपासलेले आहेत, जोपासले जातात.

शिवाय अशा रूपांतून आणखी रूपे होतात ती वेगळीच. उदा. क्रियापदांची नामासारखी रूपे, शब्दयोगी अव्यय लावलेल्या शब्दांची पुन्हा नामासारखी रूपे इ.

त्यामुळे
'विमानातल्यांवरच्यांसारखी' संकटे 'जहाजातल्यांवरच्यांहून' वेगळी 'दाखवण्यामागच्या' शक्यता तपासायला हव्यात.

अशासारख्या वाक्यातल्या शब्दांमध्ये चुका शोधून दुरुस्त्या सुचवायच्या असल्यास केवळ विमान, जहाज आणि दाखवणे एवढेच शब्द जोपासणे पुरेसे होते.

(हे केवळ उदाहरण दिलेले आहे. अद्याप मनोगताच्या जालीय शुद्धिचिकित्सकाच्या आवाक्यात इतक्या शक्यता येऊ शकत नसल्याने त्यावर सध्या काही मर्यादा घातलेल्या आहेत. )

मनोगतचा शुद्धिचिकित्सक सर्वशक्तिमान नाही! त्यात सुधारणेला भरपूर वाव आहे. वेळाच्या उपलब्धतेनुसार त्यात सुधारणा केल्या जातात.