जर तुम्ही ठिबक सिंचन करून पहिले आहे तर त्यात आणखीन फार वेगळे काहीही नाही. पुण्यात जैन इरिगेशन या कंपनीचे ठिबक सिंचन सामान मंडई जवळ दुकानात मिळते. वेगवेगळ्या फ्लो रेट ने पाणी देण्या करता वेगवेगळी नोझल्स, स्प्रिंकलर, वगैरे असतात. जर तुमच्या "तज्ञ" माणसाला हे कळले नसेल तर अर्थातच तो तज्ञ नव्हता. हे सर्व अर्ध शिक्षित शेतकरी सुद्धा वापरू शकेल असे बनविलेले असते. तेव्हां जे अर्ध शिक्षित शेतकर्याला जमते ते मला पण जमेलच असा विशवास ठेवून पुढे चला. मात्र याची देखरेख करावी लगते. (नोझल स्वच्छ करणे, इत्यादी). तसेच सिस्टिमच्या सुरवातीलच एक फिल्टर (तो पण त्याच सप्लायर कडे मिळेल) बसविणे जरूरी आहे.  अन्यथा नोझलची भोके चोक होतील.