विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वी 'आ'कारान्त पुंलिंगी शब्दांचे सामान्यरूप होते. फक्त षष्ठी नव्हे तर प्रथमा सोडून बाकी सर्व विभक्त्यांच्या प्रत्ययांपूर्वी होते. उदा. घोड्यास, घोड्याला, घोड्यांना, घोड्याने, घोड्यांनी, घोड्याहून, घोड्यांत वगैरे. 'आ'कारान्त एकवचनी स्त्रीलिंगी शब्दांमध्ये ते  मायेला, मायेने, चर्चेत,  असे 'आ'चे 'ए' होते.