आता मला लिखित उदाहरण आठवत नाही

गीतरामायणात एक उदाहरण आहे, असे आठवते

सोडुनि  आसन उठले राघव
उठुन कवळिती अपुले शैशव
पुत्रभेटिचा घडे महोत्सव
परि तो उभयां नच माहिती

येथे पिता पुत्र हे दोघेही सजीव आहेत आणि त्यांच्यासाठी उभय हा शब्द वापरलेला आहे.

अर्थात येथे राम आणि लव असे उभय एकदा आणि राम आणि कुश असे उभय दुसऱ्यांदा अशा उभय वेळां हे उभय वापरलेले असावे! (राम समजा दोघा लवकुशांना एकदम भेटला असता तर तेथे तिघांसाठी उभय हा शब्द वापरणे योग्य ठरले नसते असे वाटते.   )