' राम आणि शाम बाजारात फिरत असता उभयांना/उभयतांना कसलासा गलबला ऐकू आला. ' या वाक्यात 'उभयतांना' पेक्षा 'उभयांना' या शब्दाचा वापर जास्त समर्पक वाटतो. 'उभय' या शब्दाला 'ता' प्रत्यय फक्त नवराबायकोच्याच संदर्भात योजलेला पाहिला आहे बाकीचे पर्याय जसे की 'उभय', ' उभयां' वगैरे सार्वत्रिक वापरल्यास खटकत नाहीत.