जैन इरिगेशन कंपनीमधलाच होता तो 'तज्ञ'. त्यांना खरेतर एवढुशा बागेसाठी ठिबक सिंचन सोय करून द्यायला येण्यात अजिबात रस नव्हता पण मी अगदी मागेच लागले म्हणून आले असावेत. असो.
शेतकऱ्याचे म्हणाल तर शेतीमध्ये एकावेळी एकाच प्रकारची आणि साधारण एकाच वयाची रोपे शेतीत लावली जातात त्यामुळे सर्व रोपांची पाण्याची गरज एकसारखीच असते असे गृहित धरणे योग्य ठरते पण घरगुती बागेत तसे होणे अवघड असते कारण यात प्रत्येक रोप/झाड/वेल हे वेगळ्या प्रकारचे आणि वयाचे असण्याचीच शक्यता जास्त असते. जसे की ६ वर्षाच्या लिंबाच्या झाडाला लागणारे पाणी हे १ वर्षाच्या चिकूला खूप जास्त होईल आणि २ महिन्याच्या समुद्रशोकाला लागणारे पाणी हे साधारण ४ वर्षाच्या आंब्याला खूपच कमी पडेल. पाईप आणून नोझल्स लावणे मी करू शकले असते पण पाण्याची वेगवेगळी असलेली ही गरज कशी पूर्ण करायची यात त्या तज्ञाची मदत होईल असे वाटून मी त्यांना बोलावले होते पण ते प्रयत्न निष्फळ गेले असे खेदाने म्हणावे लागते आहे कारण त्यांनी एकच प्रकारचे नोझल्स आणले होते.
तुम्ही जे म्हणालात की
वेगवेगळ्या फ्लो रेट ने पाणी देण्या करता वेगवेगळी नोझल्स, स्प्रिंकलर, वगैरे असतात.
त्याबदल थोडी अजून माहिती देऊ शकाल का? मुख्य पाईपलाच वेगवेगळी नोझल्स लावून पाणी कमी जास्त देता येते असे काही तुम्हाला सुचवायचे आहे का? म्हणजे वर दिलेल्या उदाहरणात म्हटल्याप्रमाणे जर लिंबू, चिकू, कोरफड आणि समुद्रशोक एकानंतर एक असे लावलेले असतील तर एकाच पाईपला वेगवेगळी नोझल्स लावून आपण सर्वांना योग्य पाणी मिळेल अशी योजना करू शकतो का?