डी आय वाय, म्हणजे डू इट युवरसेल्फ. या करता कोणा तज्ञाला बोलाविन्याची काहीही आवश्यकता नाही. आता तुम्ही ड्रिप लावलेच आहे तर तुम्हाला माहीतच असणार, पण इतरां करता म्हणून थोडी उजळणी. पाण्याच्या सोर्स पासून एक १८ मिमि डाया चा पाईप बागेत खेळवतात. त्याला प्रत्येक रोपाच्या जवळ एक भोक पाडून त्यात एक सहा  मिमि च्या पाईपची ब्रांच लावतात. या  ब्रांचच्या टोकाला तुम्ही ड्रिपर, मायक्रो-स्प्रिंकलर,  मिनी स्प्रिंकलर, इत्यादी हवे ते लावू शकता. जैन इरिगिशेन कंपनीचे ड्रिप सिस्टम मी माझ्या घराच्या बागेत लावली आहे.  ड्रिप नॉझल फ्लो रेट प्रमाणे कलर-कोडेड असतात. काळे, निळे, हिरवे, लाल, इत्यादी. तुम्ही एक नोझल बसविले व तुम्हाला त्याचा फ्लो रेट कमी आहे असे वाटले, तर तुम्ही ते काढून दुसरे लावू शकता. तुम्हाला ज्या फ्लो रेटची गरज आहे असे वाटते त्या पेक्षा एक साइझ मोठा लावला तर काही फार बिघडत नाही. पारंपारिक पद्धतीने पाणी देणे येथ पासून ड्रिप हा टप्पा गाठला कि पाण्याची येवढी बचत होते कि मग प्रत्येक नॉझल अगदी तोलून मापून लावण्याची गरज नसते.

सर्व फिटिंग "प्रेस स्नॅप फिट" असतात. आणि अगदी स्वस्त असतात.  पुण्यात माझे घर (डी एस के विश्व) पासून तुळशी बागेत जैन इरिगेशन चे स्टोर  येथ पर्यंत जाऊन येण्यात पेट्रोलचा खर्च जास्त असतो, ड्रिपच्या सामानाचा कमी.  एक पक्कड (प्लायर्स) या व्यतिरिक्त कोणत्याही हत्याराची गरज नसते. फार तर, पाईप कापण्या साठी हॅकसॉ चे एक ब्लेड. "दाते" असलेली किचन सुरी पण चालेल. सहा मिमि पाईप मध्ये नॉझल, किंवा कनेक्टर इत्यादी बसवताना एका कप मध्ये उकळते गरम पाणी घेऊन पाईप चे टोक त्यात दोन मिनिटे बुडवून ठेवावे. म्हणजे नॉझल त्यात सहज आत सरकेल. व पाईप गार झाला कि घट्ट बसेल. या पेक्षा यात कोणतेही तंत्र ज्ञान नाही.

प्रगत देशात अशी सर्व कामे स्वतःच करायचा प्रघात आहे.  म्हणून त्याला डी आय वाय म्हणतात. पैसे तर वाचतातच, पण आपण करण्याचा एक वेगळा आनंद पण असतो.