ह्या वाक्यातला 'उभयतां' चा वापर गमतीशीर वाटला. वर्तमान मराठीमध्ये हे रूप 'उभयतांना' असे झाले असते.
बरोबर. द्वितीयेचे प्रत्यय (स ला ते, स ला ना ते) लिहिले गेले नाहीत तर त्याला गुप्त द्वितीया असे म्हणतात असे वाटते. कवितेत असा वापर कित्येकदा पाहायला मिळतो.
उदा.
श्री गजानना, मूषकवाहना,
पूर्ण कृपा करुनी आम्हां सुमती दे मना
किंवा
लग्नाला जातो मी द्वारकापुरा
येथे आम्हां, मना आणि द्वारकापुरा ह्या गुप्त द्वितीया आहेत.
(कदाचित गुप्त द्वितीया ऐवजी दुसरा काही शब्द असेल.)
धन्यवाद.