हीच अनुभवी माहिती आधीच मिळाली असती तर निश्चितच मी सामान आणून स्वतःच बागेत ड्रीप सिस्टीम लावली असती. असो. आता माहिती मिळाली आहे ना तुमच्याकडून, आता निश्चित करेन. तुमचे या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
आपण गरजेनुसार मुख्य पाईपला भोके पाडून ब्रांच पाईपना नॉझल्स लावले पण कालांतराने आपण बागेच्या रचनेत बदल केला किंवा मधले एखादे रोप काढून टाकले तर आहे त्याच मुख्य पाईपला केलेले पण आता नको झालेले भोक बंद करण्यासाठी काही प्रभावी उपाय आहे का?