मुख्य पाईपला केलेले पण आता नको झालेले भोक बंद करण्यासाठी काही प्रभावी उपाय आहे का

आहे. भोक बंद करन्या करता एक "प्लग" मिळतो, ज्याची किंमत फक्त एक रुपया असते. तो भोकात स्नॅप फिट करायचा.  पण समजा तुम्हाला असे प्लग असतात हे माहीतच नाही, किंवा तुम्ही घेतले होते तेवढे संपले, तर ?  तुमच्या बागेत आधी पासूनच ड्रिप सिस्टम आहे.  ६ मिमी पाईप ची किंमत फक्त ३ रु / मीटर असते, व ड्रिपर साधारण ५ रु चा असतो. म्हणजे एक ते दीड मी लांबीच्या ब्रांच ची किंमत साधारण दहा रु भरते. म्हणजे, ६ मिमि चा ब्रांच पाईप १८ मिमी च्या मेन पाईप मधून उखडून काढण्याची गरज नाही.  त्या ब्रांच च्या टोकाची ड्रिपर नॉझल बंद केली की काम झाले, आणी तसे केल्यास फक्त दहा रु वाया जातात.  तर, जर तुम्ही बागेत जाऊन एक ब्रांच हातात घेऊन ती कशी बंद करता येईल हे पाहिले असते तर तुमच्या लक्षात आले असते कि  नॉझल चे पुढचे भोक जेमतेम एक मिमी येवढे व्यासाचे असते. ते बंद करन्या करता तुम्ही त्यात

१- फेविकॉल चे दोन थेंब टाकू शकता
२- एम-सील ची एक गोळी (कात-गोळी सारखी) करून त्यात सारू शकता
३- कणकीची एक गोळी करून त्यात सारू शकता
४- नॉझल्ची कॅप (फिरकी) उघडून त्यात एक प्लॅस्टिकच्या पिशवीतून कापलेला प्लॅस्टिक्चा तुकडा घालून कॅप परत बंद करू शकता. (परत गरज पडल्यास तीच नॉझल परत चालू करता येईल.)
५- वगैरे.

थोडक्यात काय, तर  केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे
. स्पष्टोक्ती बद्दल माफी, पण घरातील ही लहन-सहान कामे डी. आय. वाय. करण्या करता फारसे "ज्ञान" लागत नाही. डी. आय. वाय. करणे हा एक "पिंड" असतो. (attitude). तो तुमचा आहे का, या वर विचार करावा.