तुमच्या ड्रीप सिस्टीमबद्दलच्या अनुभवातून तुम्ही या प्रश्नावर काय मार्ग काढला असेल हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेतून मी प्रश्न विचारला होता. मी पूर्वी केलेले साधे उपाय तितकेसे प्रभावी झाले नव्हते म्हणून तुमच्याकडे काही प्रभावी उपाय असल्यास बघावे इतकाच माझा हेतू होता. एखादी गोष्ट आपण स्वतः/मोलाने दुसऱ्याकडून करून घेऊन त्यात अपेक्षितसे यश न आल्यास त्या गोष्टीचा नाद सोडण्यापेक्षा त्या क्षेत्रातील अनुभवी माणूस शोधायचा प्रयत्न करून त्यांना त्याबद्दल मार्गदर्शन मागण्याकडे माझा कल असतो इतकेच. बाकी तुम्ही माफी मागायची काही जरूर नाही कारण तुमच्या या धाग्यावरील प्रतिसादांमधून मला अपेक्षित होते ते मार्गदर्शन मिळाले आहे. धन्यवाद.