हे जे "म्हणतात" तुम्ही उध्रुत केले, त्याचा अर्थ असा,  कि संख्या शास्त्र चुकिच्या प्रकारे वापरल्यास (अज्ञानपोटी किंवा जाणून) चुकिचे निष्कर्श निघू  शकतात.  संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) ही गणिताची, म्हणजे प्युरेस्ट ऑफ प्युर सायन्सेस, शाखा आहे. विषय गंभीर आहे व त्यावर गांभीर्याने चर्चा अपेक्षित आहे.  प्रतीसाद लिहीण्या आधी
१- भारताचा सिंचन नकाशा
२- शेती उत्पादन नकाशा
३- हेक्टरी शेती उत्पादकता नकाशा (किंवा टेबल)
४- दरडोई उत्पन्न
 वगैरे माहीती तुम्ही तपासली असती, तर बिहार मधील माती सुपीक आहे व पाणी मुबलक आहे म्हणून शेतकरी सुखी आहे, असल्या कॉमेंट केल्या नसत्या. बिहार हे ज्यांना "बिमारु" राज्ये अशी संज्ञा दिली गेली, (BiMaRU, म्हणजे बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, व उत्तर प्रदेश) यात प्रथम आहे. ही संज्ञा दिली गेली त्या नंतर  मध्य प्रदेश व राजस्थान त्यातून बर्याच अंशी बाहेर पडले. बिहार होता तिथेच आहे.
 
मुख्यमंत्री लालू प्रसाद - राबडि  देवी यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध असा येतो, कि महाराष्ट्रात शेतीच्या दैन्या अवस्थेचे कारण सरकारची शेती विषयी अनास्था, चुकीची धोरणे, असे सांगण्यात येते.  म्हणून हे विचारावे लागते, कि लालू प्रसाद - राबडि  देवी यांची आस्था, धोरणे वगैरे, - थोडक्यात म्हणजे त्यांचा कारभार - महाराष्ट्रातील मुख्यमंत्रयांच्या पेक्षा चांगले होते काय?