आणखी कोणती आकडेवारी आणि कळीचे मापदण्ड (की इन्डिकेटर्स?) मोजून आणि तुलना करून याचा अधिक अभ्यास करता येईल का?  नक्कीच करता येईल. संख्याशास्त्रीय विश्लेषण करताना साधारण पद्ध्त अशी असते कि आधी आपण मनाशी काही अंदाज ठरवितो, ज्याला हायपोथेसिस म्हणतात. व मग संख्याशास्त्रीय विश्लेषण करून ते अंदाज बरोबर का चुकिचे हे तपासून पाहायचा प्रयत्न करतो. कोणते मापदंड वापरायचे हा फार क्लिष्ट विषय आहे, पण साधारणतः तुम्ही काय अंदाज केला आहे व काय सिद्ध करण्याचा किंवा तपासून पाहण्याचा प्रयत्न करीत आहात, त्यावर अवलंबून असते.  चुकिचे मापदंड  वापरल्यास, व जे मापदंड वापरले पाहिजे ते गाळल्यास,  चुकिचे निष्कर्ष निघतात, व काढता पण येतात.

उदाहरणार्थ - मुद्दामून शेती ऐवजी दुसरे उदाहरण घेत आहे - समजा विमान प्रवास विरुद्ध पुणे-मुंबई एक्सप्रेसवे प्रवास यात धोका किती हे तपासून पाहयचे आहे. कोनता मापदंड वापरावा ?
१- प्रती "प्रस्थान" अपघातांची संख्या
- दर दिवशी अपघातांची संख्या
३- प्रती अपघात
मृत्युंची संख्या

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे प्रवासात रोजच अपघात होत असतात,  पण प्रत्येक अपघातात मृत्यू होतोच असे नाही, व झाल्यास पण सरासरी चार- पाचच जीव जातात.त्यामानाने विमन प्रवासात अपघात फार क्वचितच घडतात. पण अपघात घडल्यास वाचण्याची शक्यता फारच कमी व एकदम शेकडो जीव जातात. कोणता मापदंड वापरणार ? तुम्हीच ठरवा. संख्याशास्त्रीय विश्लेषणाने बरोबर निष्कर्ष काढण्या करता संख्याशास्त्राचा अभ्यास तर जरूरी आहेच, तसेच आपल्या अंदाजा विरुद्ध निशकर्श आल्यास ते स्वीकारण्याचा प्रामाणिक पणा पण जरूरी आहे.  शेतीच्या प्रश्ना बाबत विशलेषणात हा प्रामाणिक पणा दिसून येत नही.