आत्महत्या करण्याचे एक प्रमुख कारण हेदेखील आहे की, आपल्या कल्पनेत असलेले आदर्श जीवनमान आणि प्रत्यक्षात आपण जगत असलेले जीवनमान यात असणारी तफावत.  ही तफावत जो जो वाढत जाईल तो तो आत्महत्या करण्याची इच्छा देखील वाढत जाईल.  तफावत वाढण्याची दोन कारणे आहेत.
  1. प्रत्यक्षातले जीवनमान अतिशय हलाखीचे असणे.  (ज्याची आकडेवारी आपण संख्याशास्त्रानुसार इथे मांडू शकतो. )
  2. आपल्या कल्पनेत असलेले आदर्श जीवनमान अतिशय उच्च पातळीवरील असणे.  म्हणजे बिहारी माणसाला फारतर त्याच्या मुंबईत राहणाऱ्या नातेवाईक / मित्राचे जीवनमान आदर्श वाटत असेल.  बिहारी आयुष्याला तो कंटाळला तर चटकन मुंबई गाठून स्वतःच्या कल्पनेतले आदर्श जीवनमान जगू शकतो.  महाराष्ट्रातल्या माणसाला अमेरिकेसारख्या प्रगत देशातील व्यक्तीचे जीवनमान आदर्शवत वाटत असेल.  तसे आयुष्य जगण्याचे स्वतःचे  स्वप्न प्रत्यक्षात आणणे अवघड (अशक्यच) वाटल्याने त्याच्यात आत्महत्येची प्रवृत्ती बळावत असेल.  अर्थात हा माझा कयास आहे.  प्रत्यक्षात कुणाच्या मनात आदर्शवत जीवनाच्या काय कल्पना आहेत हे मीच काय कुठलीही संख्याशास्त्रानुसारची आकडेवारी देखील सांगू शकणार नाही.