कामगार मंडळी कारखान्यात चोवीस तास (तीन पाळ्यांत) काम करतात.  अधिकारी व प्रशासकीय वर्ग मात्र ९ ते ५ अथवा १० ते ६ अशा वेळेत काम करतो.  संध्याकाळी कार्यालयातून घरी जाण्याअगोदर आढावा घेतला जातो.  त्यावेळी उत्पादनप्रक्रियेतील काही समस्या लक्षात येतात दुसऱ्या दिवशीपर्यंत किती उत्पादन अपेक्षित आहे.  ते तसे होईल की त्यात काही समस्या याचा अंदाज घेतला जाऊन रात्रपाळीत काम करणाऱ्या कामगारांना तशा सूचना द्यायच्या असतात.  यामुळे सायंकाळी निघण्यापुर्वी बैठक घेतली जाणे यात काहीच विशेष नाही.