आकडेवारीत कोणतेच कारण दिसत नसते. आकडेवारी आपल्याला वाटत असलेले संभाव्य कारण बरोबर आहे का नाही हे पडताळून पाहण्यास मदत करते, व ते कारण बरोबर नाही असे वाटल्यास इतर कारणे हुडकनास आपल्यला उद्युक्त करते. बास.

मात्र तुम्ही मांडलेले इतर काही विचार अजबच आहेत.

१- महाराष्ट्रातल्या माणसाला अमेरिकेसारख्या प्रगत देशातील व्यक्तीचे जीवनमान आदर्शवत वाटत असेल.   बापरे !! विदर्भातील अल्पभूधारक शेतकरी  अमेरिकेतील जीवन आदर्श ठेवून जगतात ?
२- आणि समजा तसे असेल, आपल्याला जे आदर्श असे वाटते त्यापेक्षा वास्तव कमी असेल, तर लोक एक एक पायरी चढत आपला स्तर वाढविण्याचा प्रयत्न करतात. आत्महत्या करून टाकीत नाहीत. तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांनाच भ्रष्टाचार मुक्त भारत आदर्श वाटतो. (तसेच फलक मुक्त पुणे, आपल्या जिथे जावयचे असेल तिथे निमूट पणे येणारे रिक्षा चालक, २४ तास विद्युत पुरविठा, वगैरे) पण यातील काहीही शक्य नाही. मग तुम्ही कधी आत्महत्येचा विचार केलात? 
३- बिहार मध्ये आहेरे व नाहीरे यांच्यातील तफावत महाराष्ट्रा पेक्षा खूपच जास्त आहे. तेव्हां नाहीरे वर्गातील नैराश्य जास्त असावयास हवे, कमी नाही.
४- आणि तुम्हीं म्हणत तसे असेल तर जमीन मालक असलेल्या शेतकर्यां पेक्षा जास्त आत्महत्या "बिगर भू धारक" शेत मजूरांच्या असल्या पहिजेत. तसेच स्टेशन वरचे हमाल, कचरा गोळा करणारे इत्यादी अनेक वर्ग आहेत ज्यांची स्थिती शेतकर्यां पेक्षा ही वाईट आहे, त्यंच्या असल्या पाहिजेत.

आणि विषय निघालाच आहे म्हणून - स्थीती हलाखीची आहे म्हणून अनेक प्रकारच्या सबसिडी, पॅकेजेस, कर्ज माफी वगैरे फक्त शेतकर्यांनाच का? स्टेशन वर सामान उचलणारे हमाल, कचरा गोळा करणारे, - थोडक्यात, दारिद्र्य रेषे खालचे सगळेच -  इत्यादींना का नाही?